मी घरात बसणारा नाही, तर जनतेत जाणारा कार्यकर्ता – एकनाथ शिंदे

मुंबई- मी मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री झालो याची जळजळ,मळमळ होणाऱ्या लोकांना आता जमालगोटा देण्याची वेळ आली आहे. अहंकार टिकत नसतो, रावणदेखील अहंकारामुळेच मरण पावला. मी विकासाला महत्त्व देणारा माणूस असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मी घरात बसून नाही तर जनतेत जाणारा आणि फेस टू फेस
बोलणारा कार्यकर्ता आहोत, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मी असेपर्यंत लाडकी बहीण योजना कदापिही बंद होणार नाही,नगरपालिकेच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. ते अक्कलकोट येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
शिंदे यांच्या बंडामुळे तुम्ही सत्तेत : म्हेत्रे
सभेचे संयोजक माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी विरोधकांवर सभेत जोरदार टीकास्त्र सोडले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यामुळे तुम्ही सत्तेवर आला आहात, विधानसभेच्या निवडणुकीत शिंदेंचा चेहरा पुढे होता म्हणून प्रचंड बहुमत मिळाले. त्यांनी सत्ता बदल केला नसता तर तुमचे काय झाले असते,हे विसरू नका, असा सवाल त्यांनी केला.



