Uncategorized

ZP Election – घुणकी जिल्हा परिषद गटात ‘जनसुराज्य’चा मोठा डाव; उद्योगपती संजय पाटील यांच्या नावाची चर्चा!

कोल्हापूर (घुणकी): कोल्हापूर जिल्हा परिषद ( ZP Election ) निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असतानाच, हातकणंगले तालुक्यातील घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून यावेळची उमेदवारी उद्योगपती संजय पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, पंचक्रोशीत त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

कोण आहेत संजय पाटील ?

संजय पाटील हे घुणकी पंचक्रोशीतील एक नामवंत उद्योगपती असून त्यांचा या भागात मोठा जनसंपर्क आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेतली होती. त्यांच्याकडे स्वतःचा एक मोठा निष्ठावंत गट असल्याने, घुणकी गटात ते नेहमीच ‘किंगमेकर’ ठरले आहेत.

विनय कोरे यांनी दिलेला ‘तो’ शब्द!

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घुणकी गटातील समीकरणे पूर्णपणे बदलली होती. जनसुराज्यचे उमेदवार अशोकराव माने यांच्या विजयासाठी विनय कोरे यांनी थेट संजय पाटील यांची भेट घेतली होती.

  • मैत्रीचा हात: अनेक वर्षांचे राजकीय वैर बाजूला सारत विनय कोरे यांनी संजय पाटील यांना अशोकराव माने यांच्या पाठीशी उभे राहण्याची विनंती केली होती.
  • जिल्हा परिषदेचा शब्द: त्यावेळी संजय पाटील यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात, विनय कोरे यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत संजय पाटील यांना जनसुराज्यकडून उमेदवारी देण्याचा ‘शब्द’ दिला असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा उफाळून आली आहे. tasha

घुणकी पंचक्रोशीत संजय पाटील यांचे प्राबल्य

घुणकी गटातील गावांममध्ये संजय पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांनी नेहमीच स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली आहे. आता स्वतः विनय कोरे यांनीच त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यामुळे, जनसुराज्य शक्ती पक्षाची या गटातील ताकद दुपटीने वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय संघर्ष तीव्र होणार ?

जिल्हा परिषद निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, अशा स्थितीत संजय पाटील यांचे नाव चर्चेत आल्याने विरोधकांच्या गोटातही खळबळ उडाली आहे. संजय पाटील यांची उमेदवारी अधिकृत झाल्यास घुणकी मतदारसंघात जनसुराज्यचे पारडे जड होणार, हे निश्चित मानले जात आहे.

दिलेला शब्द पाळण्यात हातखंडा असलेल्या विनय कोरे यांची ही नवी खेळी घुणकी गटाचा गड सर करणार का? आणि उद्योगपती संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य या भागात कशी कामगिरी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button