महाराष्ट्रराजकीय

KMC Election – कोल्हापूर महापालिका निवडणूक: प्रभाग १८ बनला ‘हाय व्होल्टेज’ रणभूमी! दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या (KMC Election) बहुचर्चित निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १८ हा यंदाच्या निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज’ लढतीचे केंद्र ठरणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील या प्रभागात सम्राट नगर, स्वातंत्र्य सैनिक वसाहत, वर्षा नगर, सुभाष नगर, मनीषा नगर, साळोखे पार्क परिसर आणि जुना रामानंद नगरमधील (जाधव पार्क, अक्कलकोट स्वामी समर्थ नगर, बळवंत नगर) असे जुने प्रभाग समाविष्ट आहेत.

आरक्षण जाहीर, चुरस वाढली:

या प्रभागासाठी जाहीर झालेले आरक्षण खालीलप्रमाणे आहे, ज्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे:

  1. अनुसूचित जाती (महिला)
  2. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  3. सर्वसाधारण
  4. सर्वसाधारण

मातब्बर आणि कार्यकर्त्यांची मांदियाळी:

या प्रभागात अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक रूपाराणी निकम, महेश वासुदेव, भूपाल शेटे, सुरेश डोणूक्षे आणि राजू हुंबे यांचा समावेश आहे. तसेच, माजी नगरसेवकांच्या कुटुंबातून सुप्रिया संजय साबळे, प्रसाद शेटे, शिवानी गुजर आणि सर्जेराव साळोखे हे देखील इच्छुक आहेत.

यासोबतच, प्रशांत पोवार, इंद्रजीत शिंदे, समीर कुलकर्णी, संदीप पवार, अभिजीत मोकाशी, स्मिता सावंत मांढरे, कौसर बागवान, अभिजीत पाटील, अश्विनी सुर्वे यांसारख्या सर्वसामान्य परंतु सक्रिय कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार जयश्री जाधव यांच्या घरातील उमेदवारही येथून नशीब अजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचे पारडे जड, सर्वसाधारण जागेवर सर्वाधिक रस्सीखेच:

प्रभाग १८ हा संमिश्र लोकसंख्येचा असला तरी, मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास येथे भाजपचे पारडे जड दिसत आहे. सम्राट नगर, स्वातंत्र्य सैनिक वसाहत, वर्षा नगर, जाधव पार्क आणि बळवंत नगर या भागांमध्ये भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या भागातून महायुतीला मोठे झुकते माप मिळाले आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वच इच्छुकांनी कंबर कसली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button